पुणे जिल्हा : भोर विधानसभा संघात स्वरुपा थोपटेंनी साधला मतदारांशी संवाद

भोर – २०३ भोर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी प्रणित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार संग्राम थोपटे यांच्या प्रचारार्थ अनंत निर्मल चारिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा स्वरुपा थोपटे यांनी मुळशी तालुक्यातील बावधन, भुगाव, भुकूम, पिरंगुट,लवळे आदी गावांमध्ये गाव भेट दौरा करून मतदारांशी संवाद साधला.
भोर विधानसभा मतदार संघ हा राज्यातील दुर्गम डोंगरी भागाने वेढलेला सर्वात आवघड मतदार संघ असून आमदार संग्राम थोपटे यांनी गेल्या तीन पंचवार्षिक मध्ये कोट्यवधी रुपये खर्चाची विकास कामे मार्गी लावली आहेत. या मतदार संघात ते चौथ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांनी गाव भेट आणि संवाद मेळाव्यांचे माध्यमातून सारा मतदार संघ पिंजून काढला असल्याने त्यांना विजयाची खात्री आहे. विकासाच्या मुद्यावर स्वरुपा थोपटे यांना प्रचार दौऱ्र्यात मोठा प्रतिसाद आहे.
या वेळी या प्रचार दौऱ्र्यात पुणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे, मुळशी तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महिला अध्यक्षा सुरेखा तोंडे, काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्ष निकिता सणस, कार्याध्यक्ष सविता गव्हारे, यांच्यासह सारिका शिंदे, राहुल जाधव, मोहन गोळे, ललिता पवळे, गौरीताई गोळे, सारिका कळमकर, अर्चना सुर्वे, पोपटभाऊ कळमकर, मंगेश दगडे, गणेश पवळे, सौरभ गोळे आदी मुळशी तालुक्यातील महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





