Pune District : राजगुरूनगरवासीयांना तीन महिन्यांत स्वर्गरथ समर्पिक करणार

राजगुरूनगर : राजगुरूनगर आणि परिसरातील सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण असेल असा स्वर्गरथ तीन महिन्यांत समर्पित केला जाईल, असे आश्वासन आमदार बाबाजी काळे यांनी दिले. राजगुरूनगर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 128 वी जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली. शहरातील हुतात्मा राजगुरू, भगतसिंग सुखदेव स्मृतीशिल्प प्रांगणात जयंती सोहळा साजरा करण्यात आला.
यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच शांताराम घुमटकर, शिवव्याख्याते गुलाबराव वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष हिरामण सातकर, शिवसेना तालुका प्रमुख रामदास धनवटे, जिल्हा संघटक विजया ताई शिंदे, शिवसेना महिला आघाडी उर्मिला सांडभोर, व्यापारी असोिएशनचे विजय भन्साळी, समाजसेविका रेखा क्षोत्रिय, माजी शिवसेना प्रमुख सुरेश चव्हाण, समीर आहेर, सुदाम कराळे, सुशील शिंगवी, प्रशांत कर्नावट आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात समाजात विविध क्षेत्रात योगदान देणारे नवनिर्वाचित आमदार बाबाजी काळे, चैतन्य संस्था, खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघ, सामाजिक कार्यकर्ता शिवाजी मगर, आदर्श व्यापारी विजय भन्साळी, स्वर्गरथ गाडीचे चालक शांताराम पाचारणे यांना सन्मान चिन्ह देऊन आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी हिरामण सातकर, रेखाक्षोत्रिय, गुलाबराव वळसे, विजयाताई शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी प्रास्ताविक नेताजी सुभाषचंद्र बोस प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अशोक दुगड, यांनी केले तर सूत्रसंचालन, सुदाम कराळे, वामन बाजारे, यांनी केले. आभार संतोष गाडेकर यांनी मानले.
340 जणांची नेत्रतपासणी
जयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 340 जणाची नेत्र तपासणी करण्यात आली तर 275 जणांना चष्मे वाटप करण्यात आले.





