पुणे जिल्हा : स्वकाम सेवा मंडळाची पांडुरंगाच्या चरणी तब्बल २२ दिवस सेवा

आळंदी – येथील श्री. ज्ञानेश्वर महाराज स्वयंसेवा कार्यकारी मंडळ, आळंदी देवाची, या मंडळाच्या सुमारे 305 जणांच्या ताफ्याने आषाढी वारी निमित्त पंढरपूर येथील श्री पांडुरंगाचे मंदिर, व मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी गेली अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. यंदा देखील या मंडळाचे आषाढी वारीनिमित्त विनामूल्य मंदिर स्वच्छता, परिसरातील स्वच्छता करणे कामी तसेच देणगी पावत्या फाडणे, ग्रंथ विक्री करणे व इतर देवस्थानने सांगितलेली अत्यावश्यक अशी कामे करण्याकरिता मंडळाचे आळंदीसह जालना जिल्ह्यातून महिला व पुरुष मिळून 305 जण सेवेसाठी दि. सहा जून रोजी पंढरीच्या पांडुरंगा चरणी सेवेसाठी रुजू झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सुनील ज्ञानेश्वर तापकीर व आशा सुनील तापकीर यांनी दिली.
सदरची स्वच्छता सेवा ही 30 जून ते 21 जुलै पर्यंत अखंड राहणार आहे. यामध्ये 145 पुरुष 159 महिलांचा समावेश राहणार आहे.
मुख्य यात्रेच्या दरम्यान म्हणजेच दिनांक 17- 7- 2024 ते दिनांक 21-7-2024 या कालावधीत 109 जण चार तास मंदिर व चार तास मंदिर परिसर अशी सेवा 24 तास सुरू राहणार आहे.
यासाठी कार्यकारी मंडळाकडे दोन ॲम्बुलन्स, सहा टेम्पो व इतर चार चाकी वाहने विनामूल्य सेवेसाठी वापरण्यात येणार आहेत. देणगी विभागासाठी सुनील निवृत्ती तापकीर लोहगाव यांचेकडून ट्रक डिझेल व ड्रायव्हर विनामूल्य पंधरा दिवस देण्यात येणार आहे. खजिनदार धनाजी गावडे, उपाध्यक्ष सुभाष बोराटे, त्याचबरोबर बाळासाहेब ठाकूर,कालिदास फुगे, संतोष आरोटे,
सुभाष तांगडे, अरुण देवकाते, अंकुश बटवाल, शरद आल्हाट, ज्ञानेश्वर पठारे,उमेश गावडे, प्रवीण काळजे, बाळासाहेब गांधिले, राजू सस्ते,रामदास बांदल, अरुण तागडे, अशोक सुरंग,शांताराम गोरे, लक्ष्मण रासकर,विलास भुजबळ, बबन लोखंडे,विलास पठारे व इतर सर्व स्वयंसेवक स्वयंसेविका यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कामी मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य महिला, पुरुष यांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे अध्यक्ष सुनील तापकीर यांनी सांगितले.





