पुणे जिल्हा : सुनेत्रा पवार यांचा मतदारांशी संवाद
Updated On:

मुळशीत समस्या जाणून घेतल्या
पिरंगुट : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी मुळशी दौऱ्यात मतदारांशी संवाद साधला.
दौऱ्यात त्यांनी विविध गावांसह विविध सोसायट्यांना भेटी देत नागरीकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांच्या समस्याही त्यांनी यावेळी जाणून घेतल्या.
अजित पवार हे नेहमीच विकासाला महत्व देतात. केंद्रात आणि राज्यात एकमताचे सरकार असेल तर विकासाला गती प्राप्त होते.
त्यामुळेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिल्याचे सांगत सुनेत्रा पवार यांनी बारामतीसारखा विकास साधण्यासाठी साथ द्यावी, असे आवाहन करण्यात आले. दरम्यान, ठिकठिकाणी सुनेत्रा पवार यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.





