Pune District :लडकत स्कूल ऑफ फाउंडेशनची यशस्वी घोडदौड

प्रथम वर्धापनदिन दिमाखात साजरा : गुणवत्तापूर्ण शिक्षणावर मोहोर
बारामती – येथील लडकत स्कूल ऑफ फाउंडेशनचा प्रथम वर्धापन दिन अत्यंत दिमाखात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थी पालक व मान्यवरांच्या उपस्थितीत अप्रतिम, “उत्कृष्ट”, “प्रेरणादायी” असा वर्धापन दिन सोहळा पार पडला. हाच उत्साह व प्रेरणा कायम ठेवत लडकत स्कूल ऑफ फाउंडेशन भविष्यातही गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कार्यरत राहील, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कथक नृत्य सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
संस्थेचा इतिवृत्तांत सुष्मिता चव्हाण यांनी प्रभावीपणे मांडला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती माता व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार, मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
यावेळी संचालक गणेश लडकत, प्राचार्य रामचंद्र वाघ, खजिनदार दत्तात्रय लडकत, संचालिका शुभांगी लडकत, संचालिका प्रियंका लडकत, संचालिका प्रियंका चंद्रशेखर लडकत, माजी सरपंच बाबासाहेब चौधर, माजी मुख्याध्यापक मुकुंद एकतपुरे, दैनिक प्रभातचे तालुका प्रतिनिधी प्रमोद ठोंबरे, प्रमोद हरीदास शिंदे, सनदी लेखापाल प्रवीण लोखंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी चंद्रशेखर लडकत (माजी न्यायाधीश अमोल वाबळे,
समता परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष अनिल लडकत, युवा उद्योजक लक्ष्मण रंधावे, अॅड. अनिल फरतरडे, अॅड. प्रशांत रूपनवर, उद्योजक अभिजीत झगडे, सक्सेस कोड ॲकॅडमीचे संचालक अण्णासाहेब भुजबळ, डॉ. विराज येळे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. काशीद यांनी अत्यंत नेटकेपणाने पार पाडले.
सिद्धी बढे नीट परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम आलेली सिद्धी बडे हिचा सत्कार यावेळी करण्यात आला. तानाजी गवळी, प्रफुल्ल आखाडे, हर्षल काळे, परमेश्वर माने, नितीन लाघुडे, संग्राम टाकले, प्राजक्ता जाधव, सांस्कृतिक कार्यक्रम अध्यक्षा रेश्मा लडकत यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. विना गुरव यांनी आभार मानले.
प्रमुख मान्यवरांकडून विद्यार्थ्यांना कानमंत्र
विद्यार्थ्यांच्या मेहनतीला व पालकांच्या सहकार्याला मान्यता देणारा हा सोहळा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला. प्रमुख वक्ते सुमित उरकुडकर यांनी सांगितले की, “आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर अभ्यासाला पर्याय नाही. हवे ते मिळवण्यासाठी ध्येय ठेवा, सातत्याने प्रयत्न करा. पालकांनी आपल्या मुलांना समजून घेतले पाहिजे. अनावश्यक लाड टाळावेत. पोलीस उपनिरीक्षक दीपाली गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचा आणि सकारात्मक जीवन जगण्याचा सल्ला दिला. अध्यक्षीय भाषण संस्थेचे संचालक नामदेव लडकत सर यांनी केले. त्यांनी संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा संघर्ष, आलेल्या अडचणी आणि मिळवलेले यश याबद्दल मांडणी केली.





