Pune District : जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी गिरवले बाजारभावाचे धडे

देऊळगावराजे : देऊळगावराजे (ता.दौंड) येथील पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी बाजारभावाचे धडे गिरवले. येथे शिक्षकांनी आणि पालकांनी आनंदी बाजाराचे आयोजन करण्यात केले होते. याला देऊळगाव राजे येथील आणि परिसरातील ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादासो गिरमकर, भीमा पाटस कारखान्याची संचालक तुकाराम अवचर, देऊळगावराजे तंटामुक्ती अध्यक्ष सतीश अवचर, सोसायटीचे माजी अध्यक्ष कांतीलाल अवचर, सचिन गिरमकर, किसन शिंदे, देवेंद्र अवचर, ज्ञानेश्वर पोळ, शाळेचे मुख्याध्यापक विनायक सूर्यवंशी, माजी सरपंच स्वाती गिरमकर, शालेय समितीचे माजी अध्यक्ष नीता गिरमकर, राधा शिंदे आणि परिसरातील महिलांनी या आनंदी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.
या बाजारामध्ये मुला आणि मुलींनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला सह खाऊच्या वस्तू आणि गरजेच्या वस्तू विक्रीसाठी आणल्या होत्या. त्यामध्ये चटकदार भेळ पाणीपुरी मसाल्याचे पदार्थ चहा तसेच वेगवेगळे प्रकारचे खमंग पदार्थ, फळे त्याबरोबरच आपापल्या शेतातील तरकारीच्या भाजी पाला मुलांनी आणि पालकांनी या ठिकाणी विकण्यासाठी आणल्या होत्या व त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला.





