पुणे जिल्हा : नेतृत्व खंबीर असल्याचा विकासही जोमाने होतो -दगडे

खेड शिवापूर – नेतृत्व खंबीर असेल तर विकासही तेवढ्याच जोमाने होतो. आज किरण दगडे यांच्या कार्यशैलीमुळे भोर विधानसभेत खंबीर नेतृत्वाचा चेहरा मिळाला. त्यामुळे आमची तुम्हाला साथ आहे, असे आश्वासन गावभेट आणि बैठकांमध्ये ग्रामस्थांनी किरण दगडे यांना दिले.
भोर मतदारसंघात किटली या चिन्हावर उमेदवारी लढवत असलेले उमेदवार किरण दगडे पाटील यांनी राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या गावांना भेटी देऊन संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महिलांसह वृद्ध व्यक्तींचा सहभाग अधिक असून, गावकऱ्यांकडून बैठकांचे आयोजन करून मागील पंधरा वर्षात भोर विधानसभेतील विकासाच्या नावाने झालेल्या बट्याबोळाचा लेखाजोखाच मांडला. त्यावरून मतदारांमध्ये प्रस्थापिथांविरोधात सुप्त लाट असल्याचे दिसून आल्याचे किरण दगडे यांनी सांगितले.
भोर तालुक्यातून जाणाऱ्या महामार्गाचे काम अर्धवट, चुकीच्या ठिकाणी बायपास, अपघातांची मालिका सुरूच आहे. तालुक्यातील अनेक दुर्गम ठिकाणी आजही रस्ते, लाईट, पाणी, दवाखाना, या मूलभूत सुविधा नाहीत, अशी खदखद ग्रामस्थांनी किरण दगडे यांच्याजवळ व्यक्त केली. आमच्या हक्कासाठी, गावाच्या विकासासाठी आणि तरूणांना स्वाभिमानी रोजगार देणारे नेतृत्व पाहिजे, अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली.
त्यावेळी किरण दगडे यांनी तुमचे आशिर्वाद माझ्या पाठीशी राहूद्या, नक्कीच तुमच्या समस्यांना प्राधान्याने सोडवून भोरचा सर्वांगिण विकासाला गती देईल, असा विश्वास किरण दगडे यांनी दिला.





