पुणे जिल्हा : माजगाव परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत
Updated On:

चिंबळी : खेड तालुक्यातील चिंबळी येथील माजगाव परिसराच्या डोंगरात भटक्या कुत्र्यांची वाढत असलेली संख्या सध्या चिंताजनक ठरत असून या परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. माजगाव डोंगर भागात नागरिकांची अवस्था म्हणजे भय इथले संपत नाही अशीच झाली आहे.
यावर कायमचा तोडगा काढावा अशी मागणी होत आहे. गेल्याच महिन्यात बर्गे वस्ती भागात असलेल्या एका चिमूरड्यावरती या भटक्या कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केला होता.
यात मुलगा गंभीर जखमी होऊन अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. महिलांवरती तसेच ज्येष्ठ नागरिकांवरती हल्ले झाल्याचे देखील अनेक उदाहरणे गेल्या महिना दोन महिन्यांमध्ये चिंबळी भागात घडलेली आहेत, यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण आहे.





