पुणे जिल्हा : श्री दत्तगुरू शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक पुन्हा बिनविरोध

– अध्यक्षपदी रमेश शिंदे, उपाध्यक्षपदी किरण गावडे, सचिव अनिल गावडे यांची निवड
मंचर – आदर्शगाव गावडेवाडी येथील श्री दत्तगुरू शिक्षण प्रसारक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक पुन्हा एकदा बिनविरोध झाली. अध्यक्षपदी रमेश शिंदे,उपाध्यक्षपदी किरण गावडे,सचिव अनिल गावडे यांची निवड झाल्याची माहिती मुख्याध्यापक विनोद बोंबले यांनी दिली.
आदर्शगाव गावडेवाडी येथील १९९४ रोजी स्थापन झालेली श्री दत्तगुरू शिक्षण प्रसारक संस्था स्वर्गीय शंकरराव पिंपळे आण्णा, स्वर्गीय बाजीराव बोंबले गुरुजी, स्वर्गीय दशरथ शेळके गुरुजी यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांच्या योगदानातून पुणे-मुंबईकर यांचे सहकार्य घेऊन मुलींच्या शिक्षणास प्राधान्य देण्याच्या हेतूने सुरू झालेले हिरकणी विद्यालय या संस्थेच्या २०२४-२०२९ या कालावधीसाठी निवडणूक संपन्न झाली.बिनविरोध निवड करण्यासाठी संस्थेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाली.
सरपंच विजय गावडे याच्या मार्गदर्शनाखाली निवड समितीने संचालक मंडळ निवड करण्यात आली.अध्यक्ष रमेश शिंदे,उपाध्यक्ष किरण गावडे,सचिव अनिल गावडे,संचालक संजय शेठ पिंपळे ,सुखदेव गावडे,शंकरराव डोंगरे, भगवान गावडे, संतोष गावडे, शाळा समितीचे अध्यक्ष संतोष महादेव गावडे, ललिता गावडे, कैलाश गावडे, पूनम तळेकर, अशोक डोंगरे, निमंत्रित संचालक राजेंद्र गावडे,पांडुरंग गावडे, सल्लागार अशोक गावडे या सर्वांचे ग्रामस्थांनी अभिनदन केले.





