पुणे जिल्हा : मुलांच्या शिक्षणावर विशेष गुंतवणूक गरजेची – न्यायाधीश नम्रता बिरादार

वडगाव आनंद शाळेत कायदेविषयक शिबिर
आळेफाटा – आपला विकास झाला आहे पण अद्याप सर्वांगीण विकास झाला नाही. मुलांच्या शिक्षणावर विशेष गुंतवणूक करण्याची मोठी गरज आहे. बालकांशी निगडीत असलेल्या सर्व घटकांनी एकमेकांशी समन्वय साधत कार्यपद्धती अवलंबली पाहिजे, जेणेकरून कायद्याचा हेतू सफल होईल. तसेच पर्यावरण व त्याचे संवर्धन ही काळाची गरज असून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड आणि त्याची जोपासना हा एकमेव पर्याय आपल्यासमोर असल्याचे प्रतिपादन जुन्नर तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्षा तथा दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीश नम्रता बिरादार यांनी केले.
जुन्नर व तालुका विधी सेवा समिती, तथा पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्या सयुंक्त विद्यमाने कायदेविषयक शिबिराचे वडगाव आनंद जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी न्यायाधीश बिरादार बोलत होत्या. याप्रसंगी दिवाणी सह न्यायाधीश स्वप्ना घुले, दिवाणी सह न्यायाधीश अनंत बाजड, अॅड. रसूल इनामदार, अॅड. रवींद्र देवकर, अॅड. सुधीर कोकाटे, अॅड. केतनकुमार पडवळ, अॅड.सिद्धेश वाघोले, अॅड. गीतांजली कुर्हाडे, शीतल पटाडे, अॅड. हीना जमादार, ग्रामपंचायत सदस्य संतोष पादीर, शाळेचे शिक्षणतज्ज्ञ सदस्य डी. बी. वाळूंज,
शालेय व्यवस्थापन अध्यक्ष अविनाश चौगुले, उपाध्यक्ष संदेश काशिकेदार, सदस्य सतीश भिंगारदिवे, सदस्य जया देवकर, रेश्मा कुटे, मुख्याधाय्पक सुनील ठिकेकर, वृषाली कालेकर, मनीषा इले, संगीता कुदळे, हायस्कूलच्या मुख्याध्यापिका रजनी डुंबरे, सहशिक्षक सुनील जावळे, पांडुरंग कासार, किरण लायगुडे, नारायण पडवळ, संतोष कापडाने, अमोल जावळे, सहशिक्षिका सविता आहेर, सुरेखा काकडे, दत्तात्रय चौगुले, पोलीस पाटील आदींसह पालक मोठ्या संखेत उपस्थित होते. सह न्यायाधीश अनंत बाजड यांनी मुलांना वाचनासाठी महापुरुषांचा चरित्रांचा पुस्तकांचा संच देणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचायात समितीच्या गट शिक्षाणाधिकारी अनिता शिंदे यांनी सूत्र संचालन सुनीता वामन यांनी तर अॅड. वैशाली देवकर यांनी आभार मानले.
आपली शिक्षण व्यवस्था शिक्षणाला गुंतवणूक म्हणून पाहत नाही. त्यामुळे आपल्या मुलांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम ही बाब टाळण्यासाठी शासनाने जबाबदारी घेऊन शिक्षणाबाबत मुलभूत अधिकार दिलेले आहेत, त्याबाबत यावर विशेष भर देत शासन स्तरावर असणार्या विविध योजनांचा आधार घेत शिक्षण कसे पूर्ण करावे.
– स्वप्ना घुले, सहन्यायाधीश





