पुणे जिल्हा : सोमेश्वर देवस्थानला ‘क’ दर्जा – वळसे पाटील

पिंपरी दुमालाच्या पदाधिकाऱ्यांची भेट
रांजणगाव गणपती – उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून पिंपरी दुमाला येथील सोमेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्र ‘क’ दर्जा लवकरच प्राप्त होणार असल्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
पिंपरी दुमाला येथील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने वळसे पाटील यांची विविध विकासकामांबाबत व सोमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या तीर्थक्षेत्र’ क ‘ दर्जाबाबत भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन ॲड. प्रदीप वळसे पाटील, शिरुर – आंबेगाव विधानसभा राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष विजय खेडकर, सोमेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अभिषेक शेळके, संदीप सोनवणे, तंटामुक्तीचे अध्यक्ष अमोल चिखले, अमोल डोळस, जितेंद्र दुर्गे, पदाधिकारी आदी उपस्थित होते.
वळसे पाटील यांनी दिलखुलासपणे पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. सोमेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्र ‘क’ दर्जा प्राप्त होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.





