Pune District : उद्योजक भुजबळ यांचा सामाजिक उपक्रम

तळेगावात वाढदिवसानिमित्त बांधिलकी जपली
तळेगाव ढमढेरे – तळेगाव ढमढेरे येथील आरंभ उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष उद्योजक नवनाथ भुजबळ यांनी वाढदिवसानिमित्त वायफट खर्चाला फाटा देत सामाजिक उपक्रम राबवत महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. तळेगाव ढमढेरे परिसरातील 674 रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. यावेळी उद्योजक भुजबळ यांनी वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत समाजासमोर आदर्श ठेवला आहे.
यावेळी 345 रुग्णांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली. रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. 113 शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, 62 रुग्णांचे इसीजी, 104 रुग्णांचे एक्स-रे, 122 रुग्णांची दंत तपासणी व उपचार तसेच हाडांचे आजार, मणक्याचे आजार, स्नायूंचे आजार गुडघेदुखी, कंबरदुखी ,संधिवात, रक्तांचे आजार, उच्च रक्तदाब मधुमेह, हृदयरोग, आतड्यांचे आजार, लिव्हरचे आजार आदी विविध आजारांची तपासणी करण्यात आली.
आजाराची निदान झाल्यानंतर त्याच ठिकाणी रुग्णांना गोळ्या औषधे देण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, अनाथ वस्तीगृहातील विद्यार्थ्यांची मोफत वैद्यकीय तपासणी व स्नेहभोजन अशा विविध उपक्रमांनी भुजबळ यांच्या समर्थकांकडून वाढदिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमासाठी तालुक्यातून विविध स्तरावरील पदाधिकारी राजकीय पक्षाचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भुजबळ यांच्या सामाजिक उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे आयोजन आरंभ उद्योग समूहाच्या वतीने केले होते.





