वडगाव काशिंबेग येथील घटना
मंचर – वडगाव काशींबेग (ता. आंबेगाव) येथे बिबट्याचा वावर वाढला असून, या ठिकाणी असलेल्या श्री गोसावीबाबांच्या मंदिरावर बिबट्या अनेकदा येऊन बसल्याने त्याचे दर्शन शेतकऱ्यांना होत आहे.
वडगाव काशिंबेग येथील शेतकरी राहुल डोके यांच्या घराच्या बाजूलाच त्यांची शेती असून शेतीच्या परिसरात उसाचे क्षेत्र आहे. येथे बिबट्याचा वावर वाढला आहे. गेल्या आठवड्यात राहुल डोके यांना बिबट्याने अनेकदा दर्शन दिले आहे.
डोके यांच्या शेताच्या शेजारी असलेल्या श्री गोसावी बाबाच्या मंदिरावर पहाटेच्या वेळी बिबट्या येऊन बसत आहे.
बिबट्याचा या ठिकाणी वावर वाढल्याने तो कधीही मनुष्यावर हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळे वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी राहुल डोके यांनी केली आहे.