Pune District : सजविलेल्या घोड्यावर बसवून पुष्पवृष्टी

वाल्ह्यात हटके रंगला प्रवेशोत्सव
वाल्हे- नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे स्वागत वाल्हे (ता. पुरंदर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी वाल्मिकी विद्यालयामध्ये,नवागतांचे स्वागत आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यात आले. मित्र-मैत्रिणी भेटल्याचा आनंद व गप्पांचा माहोल अशा वातावरणात शाळांची घंटा आज वाजली.
प्रवेश करणाऱ्या नवागतांचे प्रवेशद्वारापासून संतोष गायकवाड यांनी आकर्षक सजविलेल्या घोड्यावर बसवून पुष्पवृष्टी, औक्षण करीत जरासे हटके पद्धतीने स्वागत करण्यात आले. मिरवणुकीनंतर सचिन लंबाते, सरपंच अतुल गायकवाड, गिरीष पवार, अमोल खवले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर कुदळे यांच्या हस्ते प्रवेशित विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी गीतांजली मोरे, शैला गवारी, प्रियंका कणेरे या महिला शिक्षकांनी औक्षण करुन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. अनोख्या स्वागताने मुलांचे चेहरे खुलल्याचे दिसून आले. याप्रसंगी उपसरपंच सम्राज्ञी लंबाते, पर्यवेक्षिका नाझनीन अत्तार, ह.भ.प. अशोक महाराज पवार, तेजस दुर्गाडे, सागर भुजबळ, हरिश दुबळे, सचिन जाधव, संदीप पवार, विनोद पवार, सागर दुर्गाडे, कविता पवार, विनय शहा, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर कुदळे, अनिल दुर्गाडे, लक्ष्मण भालसिंग, दत्तात्रय टिळेकर, सतीश अधिकारी, संदीप जाधव, संतोष जगदाळे, सुनील ढवळे, नीता कांबळे, मोहन गावडे आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले. प्राचार्य सतीश निगडे यांनी प्रास्ताविक केले. बाळासाहेब घोडके यांनी सूत्रसंचालन केले. संजय निर्मळ यांनी आभार मानले.





