तहसीलदार ज्योती देवरे : बैठकीला गैरहजर राजगुरूनगर : खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी सुदृढ कशी होईल यांचा प्रयत्न सुरू आहेत. यासाठी बीएलओंची बैठक झाली. त्यात 389 पैकी 300 बीएलओ बैठकीला उपस्थित होते. 89 बीएलओंना करणे दाखवा नोटीस देण्यात येणार आहे, असे तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले. राज्य निवडणूक आयोग आणि पुणे जिल्हाधिकार्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे खेड -आळंदी या विधानसभा मतदारसंघांमध्ये संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत दि. 11 व 12 तसेच दि 17 ऑगस्ट या दिवशी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मतदारांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. दि. 20ऑगस्ट पर्यंत प्रारूप मतदार यादीवर जे काही दावे हरकती प्राप्त होतील ते स्वीकारण्याचा कालावधी ठेवलेला आहे. दि.20 ते 29ऑगस्ट मध्ये या हरकतीवर दाव्यावरती सुनावणी घेऊन योग्य ती संधी प्रत्येकाला देऊन त्याबद्दलचा अंतिम निर्णय घेऊन 30 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी जे आहे ते प्रसिद्ध होणार आहे. या संक्षिप्त पुनर्वेक्षण कार्यक्रमांतर्गतला हा जो विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहीम कार्यक्रम आहे. ही मतदानापूर्वी किंवा विधानसभेची मतदार यादीच्या अंतिम प्रसिद्धी पूर्वीची मतदारांना मिळालेली ही अंतिम संधी आहे. 304 हरकती प्राप्त खेड तालुक्यातून 304 तक्रारी (हरकती) प्राप्त झालेल्या आहेत. मतदार यादीमध्ये नाव आहे; मात्र त्या व्यक्ती मयत आहेत अशा व्यक्तींच्या मृत्यू दाखले घेऊन त्यांची खात्री करून तद्नंतरच त्यांच्या नावे फॉर्म 7 भरून घेण्यात येतील. त्यामुळे ज्यांना कोणाला काही आक्षेप असतील किंवा नाव समाविष्ट करायचे असेल त्यांनी तात्काळ आपल्या जवळच्या मतदान केंद्रावरती संपर्क साधावा.आपला दावा असेल किंवा आपली काही हरकत असेल ती बीएलओंकडे सादर करावी त्यावरती योग्य तो निर्णय घेतला जाईल,