पुणे जिल्हा : बारामतीत रक्ताचा तुटवडा

रक्तदान करण्याचे आवाहन
बारामती – बारामतीमध्ये रक्ताचा तुटवडा असल्याने ब्लड बँकेतून रक्त पुरवठा करणे अशक्य झाले असल्याचे येथील लेट माणिकबाई चंदुलाल सराफ रक्तपेढीचे सचिव डॉ. अशोक दोशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून मत व्यक्त केले आहे.
सध्या बारामती परिसरातील रुग्णालयांमध्ये डेंगू सदृश आजाराच्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने त्या रुग्णासाठी लागणाऱ्या प्लेटलेटसची मोठ्या प्रमाणात रुग्णांसाठी मागणी आहे. मात्र, रक्ताचा तुटवडा असल्याने, ब्लड बँकेत सध्या प्लेटलेट उपलब्ध नाहीत. रक्तदान झाल्यास त्या गरजू रुग्णांना तत्काळ उपलब्ध करून देता येतील.
इच्छुक रक्तदात्यांनी आणि शिबीर आयोजकांनी येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित लेट माणिकबाई चंदुलाल सराफ रक्तपेढीत जनसंपर्क अधिकारी सोमनाथ कवडे यांच्याशी संपर्क करून रक्तदान करावे. जेणेकरून गरजू रुग्णांना रक्त पुरवठा करणे सोपे होईल, असेही आवाहन डॉ. दोशी यांनी केले आहे.





