Pune District : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिलीप यादव अद्यापही फरारच

सासवड : एका लग्न सोहळ्यात पुतण्या व पुतणीला पिस्तुलाने धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख दिलीप यादव अद्यापही फरारच असल्याने सासवड पोलिसांवर राजकीय दबाव आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, या प्रकरणी यादव यांच्या मुलासह पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर यादव यांच्यासह सातजण अद्यापही फरारच आहे.
विनय दिलीप यादव, एकनाथ दत्तात्रय खेंगरे, महेश काशिनाथ यादव, संकेत भुजंग यादव, रितेश भुजंग यादव असे न्यायालयीन कोठडी सुनावलेल्यांची नावे आहेत. याबाबतची माहिती अशी की, दिलीप सोपान यादव व मुलगा विनय यादव यांच्यासह 12 जणांनी लग्न सोहळ्यात पिस्तूल रोखून धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यातील पाच आरोपींना अटक केल्यानंतर सोमवारी (दि. 2) न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती.त्यांची कोठडी बुधवारी(दि.4) संपल्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. अमोल गर्जे यांनी काम पाहिले.





