पुणे जिल्हा : पिंगोरीत सतराव्या शतकातील शिलालेख उजेडात

ग्रामदैवत वाघजाई देवीच्या मंदिरात शिलालेख
नीरा – पिंगोरी (ता. पुरंदर) येथे पिंगोरीकर शिंदे घराण्याचे 1734 व्या शतकातील ऐतिहासिक शिलालेख उजेडात आले आहे. यामुळे पिंगोरी गावाचा इतिहासास उजाळा मिळाला आहे. ग्रामदैवत वाघजाई देवीच्या मंदिरात या नोंदी आहेत. हा शिलालेख गावातील ग्वाल्हेरकर शिंदे घराण्याचे ग्रामदैवत असलेल्या वाघजाई देवीच्या मंदिरात आहे.
राणोजी शिंदे पासून उत्तर मराठेशाही पर्यत स्वराज्याशी एकनिष्ठ असणारे हे महाराष्ट्रातील ग्वाल्हेर कर शिंदे हे घराणे आहे. त्यांच्या कित्येक पिढ्या या महाराष्ट्रासाठी विविध ठिकाणी लढाईत खर्ची पडल्या.
यामध्ये पानिपतची लढाई असो किवा दिल्ली स्वारी असो. कोणी ना कोणी पराक्रम गाजवला आहे. शिलालेखात असलेले विठोजी शिंदे यांनी उत्तरे कडील कर वसुलीचे काम केले आहे. त्यांचा मुलगा बापुजीराव याने तलवारीच्या जोरावर राजस्थानमध्ये वचक निर्माण केला होता.
स्वत:च्या मूळ गावी आपल्या कुळ देवतेचे वाघजाई देवीचे मंदिर बांधून किवा त्याचा जीर्णोधार करून एक सामाजिक आणि लोकहिताचे धार्मिक काम त्यांनी केले आहे. आपल्या पूर्वजांचा सार्थ पराक्रम, धार्मिक वृत्ती, दान धर्म, लोकहिताचे सामाजिक कार्य याचा वारसा बापुजीराव शिंदे यांनी जोपासला होता.
तसेच पिंगोरी गावाचे मूळ पुरुष भुलोजी शिंदे यांचे पत्र वाघुजी शिंदे यांचा पुत्र राजेश्री कोंडाजी शिंदे पाटील यांनी 2020 रूपये खर्च करून ही विहीर बांधली आहे, हेच या शिलालेखाचे महत्त्व आहे. या कार्यात प्रसाद शिंदे, विश्वजीत शिंदे, निखील व स्वप्नील गायकवाड, शेखर शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले.





