Pune District : घरातील वृद्धांची सेवा हाच आदर्श प्रपंच

पेठ : येथील श्री.वाकेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन सोनलताई बुट्टेंच्या प्रवचन सेवेने संपन्न झाला. त्यावेळी ज्येष्ठांना उर्वरित आयुष्य सुखसमाधानाने जगता येईल, असे काम सर्वांनी केले पाहिजे.असे उद्गार त्यांनी काढले. घरातील जेष्ठ हे मार्गदर्शक असतात त्यांना जीव लावा त्यांच्याकडे अनुभवाचे विशाल भंडार असते, त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी वाकेश्वर सहकारी दूध संस्थेचे अध्यक्ष अशोक धुमाळ.कार्याद्धक्ष मनोहर कंधारे, अध्यक्ष विलास रासकर यांनी संघाने केलेल्या कामाची माहिती दिली व मार्गदर्शन केले.
अध्यक्ष सरपंच संजय पवळे यांनी गावांसाठी ज्येष्ठ नागरिक संघाने केलेल्या योगदानाचे कौतुक केले. याप्रसंगी शिवराम तळेकर, तुकाराम निकम, बबनराव शिंदे, गोपाळ पवळे, अनंता बुट्टे,गिरजू भोसले, मनोहर भोजने, अशोक तळेकर, मंदाताई तळेकर , गणपत कराळे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व मोठ्या ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. ह,भ.प.अमित कातळे यांनी सूत्रसंचालन केले व विलासराव रासकर यांनी आभार मानले.





