पुणे जिल्हा : पुरंदरच्या पूर्व भागात बियाणे खरेदीची लगबग

खरीप हंगामाच्या पेरणी सुरू : बाजरीच्या बियाणांचा तुटवडा
वाघापूर – पुरंदर तालुक्यातील पूर्व भागात मृग नक्षत्राचा पाऊस वेळेवर झाल्याने सध्या पूर्व भागात खरीप हंगामाच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे. पूर्व भागात वास्तविक पाहता वाटाणा व बाजरी या पिकांना जास्त महत्व दिले जाते. सध्या पूर्व भागाचे शेतीच्या मशागतीला वेग आला आहे. सध्या पूर्व भागातील बियाण्यांच्या दुकानात शेतकरी गर्दी करताना दिसत आहेत.
शेतकर्यांकडून महिको कंपनीची 204 या बाजरीची मागणी जास्त असून या बाजरीचा सध्या बाजारात तुटवडा जाणवत आहे. मागणी असूनही सध्या विक्रीसाठी हे बियाणे नसल्याचे काही दुकानदारांनी सांगितले. 204 या जातीची बाजरी मिळत नसल्याने सध्या शेतकरी गोल्ड किंग सीड्स या कंपनीची सुमो नावाची हायब्रीड बाजरीची मागणी करत आहे.
तसेच वाटाण्यामध्ये पाहायला गेले तर सध्या कुबेर ऐपी 3 वाटाणा जास्त मागणी असल्याचे कळाले. या बियाण्यात इतर बियाण्यापेक्षा दोन तोडे जास्त होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या दुकानात ग्राहकांची गर्दी असून पाऊस जर आणखी जास्त झाला तर बियाणे खरेदीसाठी गर्दी वाढणार आहे. सध्या जास्त प्रमाणात बियाण्यांची आवक झाली आहे.
कुशाल कोलते, गुरुदत्त शेती भंडार, वाघापूर
मृग नक्षत्राचा पाऊस वेळेवर झाल्याने पेरणी करायला काही हरकत नाही.
– किरण हरपळे, कृषी सहायक, राजेवाडी





