पुणे जिल्हा : सासवड ते जेजुरी ही पायीवारीची परंपरा कायम

चिंबळी – आध्यात्मातून,आरोग्य अन् एकतेची शिकवण देत नुकतीच खेड तालुका शिक्षक संघाची सासवड ते जेजुरी ही पायीवारीची परंपरा जोपासली गेली, अशी माहिती शिक्षक संघाचे प्रवक्ते अरुण गायकवाड यांनी दिली.
प्रत्येक वर्षी हजारो वारकरी पंढरीला जातात,तो वारीचा अनुभव थोडासा तरी अनुभवावयास मिळावा,संतांची समतेची शिकवण आचरणात आणून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात व आचरणात अधिकाधिक भर घालणे व त्याची सुरुवात स्वतःपासून करणे हाच या वारीचा उद्देश आहे. या उपक्रमामध्ये अनेक शिक्षक बंधु-भगिनींनी सहभाग घेतला.
शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी हुतात्मा राजगुरु, अन् धर्मवीर छत्रपती संभाजी राजांना पुष्पहार घालून अभिवादन करीत या पायीवारीची सुरुवात करण्यात आली. दिवसभराच्या वारीनंतर खंडेरायाच्या दर्शनाने वारीची सांगता झाली.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकनेते विठ्ठलराव तांबे, शिक्षक संघाचे अध्यक्ष अभिजित नाईकरे, सरचिटणीस सोमनाथ पाचपुते, माजी अध्यक्ष तानाजी महाळुंकर, तुकाराम कुटे, शिक्षक संघाचे सर्व सोसायटी संचालक यांनी संयोजन केले.





