Pune District : सासवड – भिवरी रस्त्याचे काम सुरू
Updated On:

– जालिंदर कामठे यांच्या इशाऱ्याची घेतली दखल
सासवड – गेल्या काही दिवसांपासून सासवड भिवरी मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना व वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अपघाताच्या घटनांमध्येही वाढ होत होती.
“पंधरा दिवसांत दुरुस्तीचे काम हाती घेतले नाही, तर कार्यालयास टाळे ठोकण्याची वेळ येईल.” असा सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी दिला होता.
या इशाऱ्यानंतर विभागाला अक्षरशः खडबडून जाग आली असून तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. सध्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे.
स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, “कामठे यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर प्रशासन हलले,” अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.





