Pune district : भोर शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदी संदीप शेटे

भोर – भोर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अध्यक्षपदी पै. संदीप (बाबू) शेटे यांची तर युवक अध्यक्षपदी अनुप धोत्रे यांची निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे, माजी उपसभापती विक्रम खुटवड, माजी नगरसेवक यशवंत डाळ, नितीन थोपटे, दत्तात्रय मोरे उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी खालीलप्रमाणे संदीप शेटे (अध्यक्ष), सोमनाथ ढवळे (कार्याध्यक्ष), गणेश मोहिते (उपाध्यक्ष), सागर वालगुडे (उपाध्यक्ष), एकनाथ रोमन (खजिनदार), बाळासाहेब खुटवड (सरचिटणीस ), भोर शहर युवक अध्यक्षपदी अनुप धोत्रे, निखिल झणझणे (कार्याध्यक्ष), सोनल साळुंके (उपाध्यक्ष), नीलम रोमन (महिला अध्यक्ष), कोमल शेटे (कार्याध्यक्ष), अर्चना शेटे (खजिनदार), अक्षय चोरघे (विद्यार्थी सेल अध्यक्ष),
युवराज पालकर (ओबीसी सेल अध्यक्ष), संतोष भेलके (सांप्रदायिक सेल अध्यक्ष), इम्रान पटेल (अपंग सेल अध्यक्ष), मुस्तफा मुसा खान (अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष), तेजस मोरे (सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष) तर राजन घोडेस्वार (जिल्हा कार्याध्यक्ष), निखिल गायकवाड (जिल्हा उपाध्यक्ष) निवड करण्यात आली आहे.





