Pune District : मुरारबाजी देशपांडे यांना अभिवादन

जोगवडीत कार्यक्रम : किल्ले पुरंदरवर शिवभक्तांची गर्दी
लोणी भापकर – मुरारबाजी देशपांडे यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने किल्ले पुरंदर याठिकाणी जोगवडी येथील सुनील राजे भोसले यांच्या मित्रमंडळाच्या व पुरंदर उत्सव समितीच्या वतीने त्यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
पुरंदरेश्वर मंदिरातील शिवलिंगाचे पूजन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे सुपे परगाना प्रमुख सुनील शशिकांत राजे भोसले व अलका सुनील राजे भोसले यांच्या हस्ते झाले. माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम जगदाळे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. संतोष काळभोर व अशोक काळभोर यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी मिलिंद एकबोटे व मुरारबाजी देशपांडे यांचे वंशज संदीप पोतनीस यांच्या हस्ते वीर मुरारबाजी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून समाधीचे पूजन करून अभिवादन केले. मंगेश गावडे यांनी देशपांडे यांच्या शौर्याचा इतिहास कथन केला. मिलिंद एकबोटे यांच्या हस्ते दहावी या वर्गात प्रथम क्रमांकाचे मार्क मिळालेल्या तनिष्का राजेभोसले यांचा सन्मान करण्यात आला. येसाजी कंक यांचे वंशज सिद्धार्थ कंक भुतोंडे, धाराऊ गाडे यांचे वंशज अमित गाडे व बाबुराजे गाडे, भूषण ताकवले, बारामती दूध संघाचे माजी व्हॉईस चेअरमन संतोष शिंदे, बाबा चोरमले, प्रवीण जगदाळे, बाळासो जगताप उपस्थित होते.
आप्पासाहेब पुरंदरे यांनी महाप्रसादाची व्यवस्था केली होती. यावेळी मीना सातव, आदेश सोनवणे, सुषमा आव्हाळे, कोमल आव्हाळे, अनिता घोडके, आदिनाथ सातव, सतीशराजे भोसले, राहुल दोरगे, सोमनाथ पांगारे, शांताराम भोसले यांनी आयोजन केले. स्पंदन संस्थेच्या अध्यक्षा कामिनी ताकवले यांनी आभार मानले.





