पुणे जिल्हा : सासवडमध्ये 26/11तील विरांना अभिवादन
Updated On:

संविधान, आपचा वर्धापन दिन उत्साहात
सासवड – पुरंदर तालुक्यातील सासवड येथे आप पुरंदर तालुका जनसंपर्क कार्यालयात 11वा वर्धापन दिन व संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी 26/11 च्या मुंबई येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या वीरांना व निष्पाप नागरिकांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी भारतीय संविधानाचे सामूहिक वाचन पुणे जिल्हा अध्यक्ष अमोल देवकाते यांच्या नेतृत्वात करून भारत माता की जयच्या घोषणा देण्यात आल्या. युवा प्रदेशअध्यक्ष मयूर दौंडकर म्हणाले की, आप हा देशातील सर्वात वेगाने वाढणारा एकमेव पक्ष आहे.
पुरंदरचे अध्यक्ष दत्तात्रय कड यांनी चालू राजकीय घडामोडींवर भाष्य करताना येणार्या काळात संविधान बचावाचे कार्य आप कार्यकर्ते करणार असल्याचे सांगितले. या वेळी जिल्हा व तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते





