Pune District : सहकार भारतीच्या भोर तालुका अध्यक्षपदी सदाशिव धुमाळ

भाटघर – सहकार भारती संस्थेचे पुणे विभागप्रमुख गिरीश भवाळकर यांनी पुणे जिल्ह्याची कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली. यामध्ये सदाशिव धुमाळ यांची भोर तालुका अध्यक्ष पदाच्या नावाची घोषणा करण्यात आली. सहकार भारतीचा दोन दिवसीय निवासी अभ्यास वर्ग नुकताच आळंदी येथे पार पडला. यावेळी ही निवड जाहीर करण्यात आली.
सहकार भारती ही संस्था १९७८ मध्ये सहकार क्षेत्राच्या उत्थानासाठी स्थापन झालेली समर्पित संघटना असून गेली ४४ वर्षे देशभरातील पाचशेहून अधिक जिल्ह्यांमध्ये प्रभावीपणे कार्य सुरू असल्याचे भवाळकर यांनी सांगितले. सहकार भारतीने विना सहकार नाही उध्दार या घोषवाक्याला विना संस्कार नही सहकार, अशी अर्थपूर्ण जोड दिली आहे,
असे सहकार भारतीचे साखर कारखाना प्रकोष्ठ प्रमुख साहेबराव खामकर यांनी दिली. सहकार भारतीच्या माध्यमातून सहकारी संस्थांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील, असे मत धुमाळ यांनी व्यक्त केले. निवडीबद्दल धुमाळ यांचे भवाळकर, खामकर यांनी अभिनंदन केले.





