आमदार बाबाजी काळेंच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश राजगुरुनगर – चाकण वाहतूक कोंडीसाठी 100 कोटींचा निधी महाराष्ट्र शासनाकडून मंजूर झाला असल्याची माहिती आमदार बाबाजी काळे यांनी दिली. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे तर रस्ते चाकण परिसरातील रस्ते सुधारले तर वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे देशभरात पुणे जिल्ह्यातील सर्वात गंभीर मानली जाणारी चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी समस्या सोडविण्यासाठी राज्य शासनाने 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. औद्योगिक विकासाबरोबर वाढत्या लोकवस्तीमुळे चाकण परिसरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनली होती. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय व्हावा यासाठी आमदार बाबाजी काळे यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी पावसाळी अधिवेशनात विधानभवनाच्या पायर्यांवर आंदोलन करूनही ही समस्या सरकारच्या निदर्शनास आणून दिली होती. ट्रॅफिकमुक्त चाकण कृती समितीने चाकण पंचक्रोशीतील नागरिकांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. या दोन्ही प्रयत्नांमुळे सरकारचे लक्ष अखेर या समस्येकडे वेधले गेले. 28 जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या दालनात आमदार बाबाजी काळे यांच्या उपस्थितीत सर्व विभागांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यानंतर 23 ऑगस्ट रोजी झचठऊ- आयुक्त योगेश म्हसे यांच्या उपस्थितीत चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांबाबत बैठक घेण्यात आली. या पाठपुराव्यानंतर पालकमंत्री अजित पवार यांनी प्रत्यक्ष चाकण येथे पाहणी दौरा केला होता. या सर्व घडामोडीनंतर अखेर राज्य सरकारने प्राथमिक टप्प्यात 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याचबरोबर तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या दुरुस्तीकरिता 60 कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर करण्यात आले आहेत. मंजूर झालेल्या निधीतून चाकण औद्योगिक क्षेत्रातील 9 प्रमुख रस्त्यांचे सुधारणा काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे या भागातील वाहतूक कोंडीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. ह्या निधीमुळे चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्ते सुधारले जाऊन वाहतूक सुरळीत होणार असून, नागरिकांना आणि उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे चाकण औद्योगिक क्षेत्र वाहतूक कोंडीमुक्त करणे हे आमचे ध्येय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, झचठऊ- आयुक्त योगेश म्हसे यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मी मनःपूर्वक आभार मानतो. या लढ्यात ट्राफिक मुक्त चाकण कृती समिती आणि चाकण पंचक्रोशीतील नागरिकांचे योगदानही मोठे आहे. -बाबाजी काळे, आमदार कोणकोणते रस्ते होणार सुधारले 1. चिखली ते मोई रस्ता 2. कुरुळी फाटा ते निघोजे रस्ता 3. आळंदी फाटा (चाकण) ते आळंदी रस्ता 4. च-होली बु. ते आळंदी-मरकळ रस्ता 5. निघोजे ते मोई 6. खालुंब्रे ते एमआयडीसी टप्पा 2 7. सदुंबरे ते वासुली फाटा 8. सावरदरी ते खालुंबरे 9. कुरुळी फाटा ते कुरुळी