Pune District : शिरुर-आंबेगावातील वस्तीविकासासाठी १ कोटी ४१ लाख रुपये मंजूर

मंचर : माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून शिरुर-आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील विविध गावातील मागासवर्गीय वस्तीच्या विकासासाठी १ कोटी ४१ लाख रुपये मंजूर करण्यात आले,अशी माहिती आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे अध्यक्ष विष्णूकाका हिंगे यांनी दिली.
पुणे जिल्हा परिषद, समाजकल्याण विभागांतर्गत २० टक्के जिल्हा परिषद निधी २०२४-२५ मधून मागासवर्गीय वस्ती येथे रस्ते बांधकाम करण्यासाठी पुढील गावांना निधी मंजूर करण्यात आला. अवसरी बुद्रुक कोळीआळी येथे रस्ता काँक्रिट ८ लाख ५० हजार रुपये. अवसरी बुद्रुक जाधववस्ती ते दूध डेअरी रस्ता काँक्रिट ८ लाख ५० हजार रुपये.लोणी – पंचरासवस्ती येथे रस्ता काँक्रिट ८ लाख रुपये. टाव्हरेवाडी येथे भिल्लवस्ती रस्ता काँक्रिट ८ लाख रुपये.जारकरवाडी लोलेवस्ती ते ढोबळेवाडी रस्ता काँक्रिट ८ लाख रुपये.गावडेवाडी माथावस्ती शिव रस्ता काँक्रिट ८ लाख रुपये.काठापूर बुद्रुक वेस ते नदी बंधारा रस्ता ८ लाख रुपये.ठाकरवाडी (चास) येथे पिराचीवाडी रस्ता काँक्रिट ८ लाख रुपये.जारकरवाडी काकडेमळा रस्ता काँक्रिट ८ लाख रुपये.शिंगवे सोनवणेवस्ती क्र. २ ते जल शुद्धीकरण प्लांट रस्ता काँक्रिट ८ लाख ५० हजार रुपये.चांडोली बुद्रुक कान्होबा मंदिर ते नदी बंधारा जोडरस्ता ८ लाख ५० हजार रुपये.अवसरी खुर्द येथे प्रा.आ.केंद्र ते बौद्धवस्ती रस्ता काँक्रिट ८ लाख रुपये.जांभोरी तिटकरेवस्ती रस्ता काँक्रिट ५ लाख रुपये रुपये.जांभोरी लिंबोनेचीवाडी रस्ता काँक्रिट ३ लाख रुपये.फुलवडे येथील मोहरेवाडी ते स्मशानभूमी रस्ता काँक्रिट ५ लाख रुपये.तिरपाड अंतर्गत नानवडे – ढकेवाडी येथे समाजमंदिर बांधणे ७ लाख रुपये रुपये.टाकळी हाजी ता.शिरुर येथे आपटेवस्ती रस्ता काँक्रिट ८ लाख रुपये रुपये.पिंपरी दुमाला ता.शिरुर येथील अमोल डोळस घर ते शेलार घर रस्ता काँक्रिट ६ लाख रुपये. पिंपळे खालसा ता.शिरुर येथे रामगुडेवस्ती रस्ता काँक्रिट ८ लाख रुपये रुपये या प्रमाणे निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात आले.





