पुणे जिल्हा : लोणी स्टेशन येथे रिपाइंचा जल्लोष

आठवलेंची केंद्रीय मंत्रीपदी निवड
लोणी काळभोर – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल लोणी स्टेशन (ता. हवेली) चौकात रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
लोणी स्टेशन चौकात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. ‘रामदास आठवले आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’, ‘रिपब्लिकन पार्टीचा विजय असो’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी दीपक आढाळे, विशाल शेलार यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी रिपाईचे पुणे जिल्हा संघटक विशाल शेलार, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख राजु गायकवाड, हवेली तालुका युवक अध्यक्ष अभिजीत पाचकुडवे, कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे सदस्य दिपक आढाळे, तंटामुक्ती अध्यक्ष अभिजीत बडदे, अजय धेंडे, अतुल बनसोडे, पप्पू गायकवाड, रोहित उपरगुठे, मल्हार आगलावे, रमेश गायकवाड, सचिन धेंडे, इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.





