पुणे जिल्हा : इंदापूर तालुक्यात सुनेत्रा पवार यांच्या प्रचार दौर्याला प्रतिसाद

भाजप ओबीसी सेलच्या वतीने लासुर्णेत घोंगडी भेट
इंदापूर- इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथे घोंगडी भेट देऊन यळकोट यळकोट जय मल्हारचा गजर करीत भाजपाच्या ओबीसी सेलच्या वतीने बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा विशेष सन्मान मंगळवार (दि. 23) करण्यात आला.
आनंदनगर, जंक्शन येथे ग्रामस्थांसह विशेषतः मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांशी उमेदवार सुनेत्रा पवार यांनी संवाद साधला. यावेळी ऋषिकेश मोहोळकर, रोहित मोहोळकर, सीमा मोहोळकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या वैशाली पाटील यांनी संपूर्ण मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी राहण्याचे अभिवचन दिले.
आनंदनगर येथील अतिशय उपक्रमशील अशा विवेकानंद ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी उमेदवार सुनेत्रा पवार यांना भेटून पाठिंबा दिला. बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी व महायुतीची उमेदवार म्हणून मला मिळालेले हे आशीर्वाद, हा पाठिंबा अत्यंत मोलाचा आहे.
असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. यावेळी सुरेश कापडी, सुहास वाळिंबे, रुपेश चौधरी, प्रवीण कसबे, अॅड. विकास पवार, विष्णू माने, नागरिक उपस्थित होते. तर इंदापूर शहरात विविध ठिकाणी भेटी देत मेळाव्यात मतदारांना मार्गदर्शन सुनेत्रा पवार यांनी केले.





