पुणे जिल्हा : आमदार बेनकेंच्या प्रचार रॅलीला प्रतिसाद

नारायणगाव, वारुळवाडी, आनंदवाडीतील प्रश्न सोडवण्याची दिली ग्वाही
नारायणगाव – जुन्नर विधानसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार (राष्ट्रवादी काँग्रेस) तथा आमदार अतुल बेनके यांना नारायणगाव परिसरातील वारुळवाडी, आनंदवाडी येथे प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
यावेळी ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष सुजित खैरे, उद्योजक संजय वारुळे, तानाजी तांबे, अॅड. जमीर कागदी, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका आरती वारुळे, माजी भाऊसाहेब बनकर, जंगल कोल्हे, संदीप वारुळे, श्रीकांत पाटील, नितीन गुंजाळ, जांबाभाऊ कोल्हे, उपसरपंच ज्योती संते, परशुराम वारुळे, हनुमंत काळे, सतिश दळवी, डॉ. अमोल बंगाल, डॉ. सुजित दुसाने, उल्हास भोर, सतीश तंवर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
स्व. वल्लभ बेनके यांची सामाजिक जीवनाची सुरुवात वारुळवाडी-आनंदवाडी येथून झालेली असून वारूळवाडी गावचा झपाट्याने विकास होत आहे. वारुळवाडी नारायणगाव परिसराला विकासाबाबत अग्रेसर ठेवण्याचे काम पुढील काळात केले जाणार असल्याची ग्वाही महायुतीचे उमेदवार आमदार अतुल बेनके यांनी प्रचारा दरम्यान वारुळवाडी येथे दिली.
परिसरातील विकासासाठी भविष्यात लागणारे पाणी कमी पडू देणार नाही. तसेच परिसरातील येणरे सावरगाव मुख्य रस्त्याचा प्रश्नमार्गी लावल्याचे समाधान असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले. वारुळवाडी येथिल भागेश्वर मंदिरात दर्शन घेऊन प्रचार रॅलीला सुरुवात आली होती. विकासासाठी आमदार अतुल बेनके यांनी कोट्यवधी रुपयांची कामे केल्याने आमदार अतुल बेनके यांचे मतदारांनी आभार मानले.





