पुणे जिल्हा : आमदार बेनकेंच्या प्रचार फेरीला प्रतिसाद

धालेवाडी तर्फे हवेली, शिरोली बुद्रुक, कुरण येथे जोरदार स्वागत
ओझर – जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार (राष्ट्रवादी काँग्रेस) तथा विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी धालेवाडी तर्फे हवेली, शिरोली बुद्रुक, कुरण येथे काढलेल्या प्रचार फेरीला मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला असून अनेक कार्यकर्ते, महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेनके यांचे ठीक ठिकाणी महिलांनी औक्षण व ग्रामस्थांनी फुलांची उधळण करून स्वागत केले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक पूजा बुट्टे, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, विकास दरेकर, तान्हाजी तांबे, शीतल गोर्हे, अक्षदा मांडे, सीमा रगतवाल, बाबूशेठ पारवे, महादेव पारवे, गणेश पारवे, बाळासाहेब विधाटे, नामदेव पारवे, देविदास विधाटे, बबन जगताप, बाळासाहेब पारवे, सरपंच दिलीप गव्हाणे, उपसरपंच सचिन नवले, निलेश नवले, गुलाब नवले, समीर भोर, समीर नवले, विकास गव्हाणे, प्रदीप नवले, राजेंद्र नवले, विनायक नवले, पवन नवले,
नारायण नवले, वैशाली पोपळकर, शिल्पा आमले, श्रीकांत सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार अतुल बेनके यांनी गुरुवारी (दि.14) धालेवाडी तर्फे हवेली, शिरोली बुद्रुक, बस्ती, खानापूर, बादशहा तलाव, खोरे वस्ती, हापुस बाग, अमरापूर, ओतूर, धोलवड, मुंडेवाडी गावांना भेटी देऊन रॅली काढली व मतदारांचा आशीर्वाद घेतला. धालेवाडी तर्फे शिरोली जिल्हा परिषद गटात आमदार अतुल बेनके यांनी 109 कोटी 19 लाख 94 हजारांचा निधी दिला असून अनेक विकास कामे केली आहे.
भाजप कार्यकर्तेही उतरले प्रचारात
जुन्नर तालुका भाजपाचे कार्यकर्ते अतुल बेनके यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहे. ओतूर येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला त्यावेळी वरिष्ठांच्या आदेशानुसार महायुतीचे उमेदवार अतुल बेनके यांचा प्रचार करण्यास सांगितले असल्याचे भाजपाचे जुन्नर तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय डुंबरे यांनी सांगितले. भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी दिवस-रात्र एक करून युतीचे उमेदवार अतुल बेनके यांना बहुमताने निवडून आणतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जुन्नर तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय डुंबरे, उल्हास नवले, सचिन शिंदे, सुभाष तांबे, हरीश भवाळकर, सुनील डुंबरे, गणेश फाकटकर, परवेज मणियार, शंकर कुमकर, विजया पानसरे, विजय नलावडे, कलावती मोढवे, विजय डुंबरे, सुनील शहा, मनोज डुंबरे, सुनंदा गाडगे, काशिनाथ औटी, मनीषा पाडेकर, मधुकर काटे आधी मान्यवर उपस्थित होते.





