Pune District: जुन्नरमधील 144 ग्रामंचायतींच्या सरपंचपदाची बुधवारी आरक्षण सोडत
Updated On:

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील 144 ग्रामपंचायतीच्या (त्यामध्ये बिगर आदिवासी 97 तर आदिवासी 47) 5 मार्च 2025 ते 4 मार्च 2030 या कालावधी करिता ग्रामपंचायत निहाय सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत बुधवारी (दि. 23) जुन्नरमध्ये आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रभारी तहसीलदार ए .बी . गवारी यांनी दिली.
जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार जुन्नर पंचायत समिती सभागृहातर बुधवारी सकाळी 11 वाजता ही आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. या आरक्षण सोडतीमध्ये पहिल्या सत्रात अनुसूचित क्षेत्रातील 47 ग्रामपंचायत सरपंच आरक्षण निश्चित केले जाईल.
तर 97 ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत पद्धतीने काढण्यात येईल. बुधवारी आयोजित या सरपंच पदाच्या आरक्षण सोडती करिता नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जुन्नर तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेले आहे.





