Pune District : कृषिमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या

वाल्ह्यात उमटले तीव्र पडसाद : निषेध करून दिल्या विविध घोषणा
वाल्हे – राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेच्या अधिवेशनात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
याचे तीव्र पडसाद वाल्हे (ता. पुरंदर) येथे उमटले. संतप्त ग्रामस्थ व शेतकर्यांनी सायंकाळी एकत्र येत कोकाटे यांच्या रमी खेळण्याचा, वक्तव्यांचा आणि शेतकरीविरोधी भूमिकेचा निषेध करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
यावेळी उपस्थित शेतकरीवर्गाने कृषी मंत्र्यांचा निषेध करून विविध घोषणा दिल्या. कृषिमंत्री रमीत रमतो; शेतकरी राबतोय उन्हा तान्हात..कृषी मंत्र्याच्या डोक्यात गेली सत्ता, म्हणून कृषी मंत्र्याला दाखवा घराचा रस्ता…, कर्जमाफी, हमीभाव, भाव फरक या गोष्टीचा कृषिमंत्र्याला पडलाय विसर.. कृषिमंत्री रमतोय रमीच्या डावात.. रम्मी मास्टर कृषिमंत्री.. अशा विविध घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी विक्रमसिंह भोसले, संभाजी पवार, सुहास खवले, सागर भुजबळ, अनिल पवार, सुधाकर पवार, शंकर पवार, चंद्रकांत भुजबळ, मोहन शिंदे, तुषार भुजबळ, राजेंद्र पवार, अंकुश भुजबळ,सुभाष शिंदे, हनुमंत पवार, दत्तात्रेय पवार, फुलचंद पवार आदी उपस्थित होते.





