Pune District : शिरूर नगरपरिषदेचा उल्लेखनीय उपक्रम

स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी योगदान
शिरूर – स्वच्छ सर्वेक्षण २०२५ आणि माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत शिरूर नगरपरिषदेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रितम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद हद्दीतील शासकीय मुलींच्या वसतीगृह परिसरात वृक्षारोपणाचा सुंदर उपक्रम राबविला. यावेळी बांबू, चिंच, कौठ, चिक्कू, जांभूळ यांसारख्या उपयोगी व पर्यावरणपूरक २३७ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२४ व माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत घेण्यात आलेल्या ‘वेस्ट टू वंडर’ स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन केले. स्पर्धेअंतर्गत शाळांमध्ये फेकून दिलेल्या साहित्याचा वापर करून आकर्षक कलाकृती व देखावे साकारण्याची कल्पक संधी विद्यार्थ्यांना दिली होती. स्पर्धेमध्ये ७ शाळांनी सहभाग घेतला होता.
पहिल्या तीन विजेत्या शाळांना ट्रॉफी व प्रमाणपत्र, उर्वरित सहभागी शाळांना प्रमाणपत्र देऊन गौरविले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नगरपरिषदेची संपूर्ण यंत्रणा सक्रिय होती. कार्यक्रमास शासकीय मुलींचे वसतीगृहाचे अधीक्षक वैशाली सटाले, मुख्याधिकारी प्रितम पाटील, आर. एम. डी. इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका अश्विनी घारु, विद्याधाम शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती मुळे, शाळा क्र. १, ३ व ६, जीवन विकास मंदिर, व्हिजन इंटरनॅशनल स्कूल आदी शाळांचे शिक्षक, विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
अभियंता आदित्य बनकर, कर निरीक्षक माधव गाजरे, नगररचना सहाय्यक पंकज काकड, कार्यालयीन अधीक्षक ज्ञानेश्वर चाकणे व शितल काळे, लेखापाल अंकुश इचके, अंतर्गत लेखापरीक्षक दत्तात्रय टोपे, संगणक अभियंता रत्नदीप पालके, विद्युत अभियंता तेजस शिंदे, स्थापत्य अभियंता शामली लाड, भूषण कडेकर, चंद्रकांत पठारे, अनिल चव्हाण, मिठ्ठू गावडे, शहर समन्वयक प्राची वाखारे, मनोज आहिरे, किरण जाधव, गणेश शेंडगे, मनोज शेळके, रामशरण आडोळे, महेश लोळगे, स्वप्नील तरटे, सागर बडगुजर, गौरव कुलथे, नीता जाधव यांचा सहभाग विशेष उल्लेखनीय होता.





