पुणे जिल्हा : 42 वर्षांनंतर जुन्या आठवणींना उजाळा

अवसरीतील विद्या विकास मंदिरात रंगला स्नेहमेळावा
अवसरी : आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथील विद्या विकास मंदिरामधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा 42 वर्षांनंता स्नेहसंमेलन मेळावा नुकताच पार पडला. जुन्या आठवणींना उजाळा देत पुन्हा भेटण्याचे ठरवून स्नेह मेळावा पार पडला.
अवसरी बुद्रुक येथील शिक्षण प्रसारक मंडळीचे विद्या विकास मंदिर, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या 80-81 च्या बॅच संमेलन मेळावा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष गणपत हिंगे उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या संस्थापक विश्वस्त कै. गेनुजी माधवराव हिंगे पाटील यांची नात विजय माला कारके यांनी विद्यालयासाठी भरीव मदत केली.
याप्रसंगी माजी प्राचार्य अंकुश शिंगाडे, पर्यवेक्षिका माधुरी खानदेशे, शामसुंदर कसाब, माजी प्राध्यापक विष्णु हिंगे, नाना पाटील, सुषमा कसाब यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष विष्णूकाका हिंगे पाटील यांचा शुभ संदेश वाचून दाखविण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव वसंत हिंगे,बाळासाहेब टावरे, संभाजी हिंगे, गुलाब रामराव हिंगे, पीएसआय सदाशिव गावडे तसेच माजी विद्यार्थी उपस्थित होते. सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून दिला.
जुन्या आठवणींना उजाळा देऊन गुरुजनांबद्दल ऋणनिर्देश व्यक्त करण्यात आला. तब्बल 42 वर्षांनी माजी विद्यार्थी एकत्र आल्याने विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळीच भावना निर्माण झाली होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप जाधव, सूत्रसंचालन देविदास शिंदे यांनी तर माजी विद्यार्थ्यांच्या वतीने संस्थेस 51 हजार रुपयाची देणगी देण्यात आली.





