Pune District :महागणपती मंदिरात अथर्वशीर्ष पठण

रांजणगावात भाविकांची गर्दी : डाळींबाचा महानैवेद्य अर्पण
रांजणगाव गणपती – येथील महागणपती मंदिरात संकष्टी चतुर्थीनिमित्त पहाटे ५ वाजता श्रींचा अभिषेक करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट आयोजनाने सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
भाविकांसाठी उत्तम प्रकारे जलद दर्शन व्यवस्था, खिचडी प्रसाद, पिण्याचे पाणी आदी सुविधा देवस्थान ट्रस्टतर्फे देण्यात आल्या, अशी माहिती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वातीताई दत्तात्रय पाचुंदकर पाटील यांनी सांगितले. दुपारी १२ वाजता देवस्थान ट्रस्ट मुख्य विश्वस्त ओमकार देव यांच्या हस्ते महापूजा व महानैवेद्य करण्यात आला.
प्रगतशील शेतकरी श नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील यांच्या वतीने मंदिर गाभाऱ्यात फुलांची सजावट करण्यात आली. रांजणगाव विविध विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक फक्कड धुमाळ यांच्या तर्फे डाळींबाचा महानैवेद्य श्री चरणी अर्पण करण्यात आला. श्री महागणपती भजनी मंडळ, रांजणगाव गणपती यांचा भजनाचा कार्यक्रम झाला.
यावेळी देवस्थानचे विश्वस्त मंडळ मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार देव, अध्यक्षा स्वातीताई पाचुंदकर पाटील, उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव डॉ. तुषार पाचुंदकर, खजिनदार विजय देव, चेअरमन दत्तात्रय पाचुंदकर पाटील, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, पांडुरंग चोरगे, हिशोबणीस संतोष रणपिसे, कर्मचारी, मान्यवर उपस्थित होते. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.





