पुणे जिल्हा : लाखणगावच्या शाळेत वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा
Updated On:

पारगाव शिंगवे – आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव येथे डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने मुलांचे वाचन, आकलन, अभिव्यक्ती आदी स्पर्धा घेण्यात आली. इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व मुलांनी यामध्ये उस्फूर्त सहभाग घेतला व आपण वाचलेल्या पुस्तकांचे थोडक्यात वर्णन केले. पुस्तकाबद्दल आपले मत व्यक्त केले.
प्रत्येक वर्गातील प्रथम तीन विद्यार्थ्यांना शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सरपंच महादेव कानसकर उपाध्यक्ष सीमा रोडे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
यावेळी सोमनाथ भागवत, दत्तात्रेय गवते, विशाल मिंडे, राहुल जांभळे, राहुल अरगडे ,खंडू जाधव, प्रियांका टाव्हरे, कविता पोंदे, हनुमंत शिंदे, दिलीप भागवत आदी उपस्थित होते.





