पुणे जिल्हा : वंजारवाडीच्या उपसरपंचपदी राणीताई चौधर बिनविरोध

बारामती – बारामती तालुक्यातील वंजारवाडी येथील उपसरपंचपदी राणीताई शरद चौधर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने राणी चौधर या बिनविरोध निवडून आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी अन्सार सय्यद यांनी केली.
याप्रसंगी सरपंच जगन्नाथ वणवे, ग्रामसेवक निलेश लवटे व ग्रामपंचायत सदस्या चिन्मयनंदा चौधर, दीपाली चौधर, शशिकला जगताप, संगीता मालुसरे व सदस्य गोरख चौधर, सागर दराडे, भारत चौधर, बाबासाहेब ठोकळे, बारामती तालुका राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष शरद चौधर, माजी सरपंच दादासाहेब चौधर व काशिनाथ दराडे, नितीन चौधर, अजित चौधर, सुनील चौधर, पिंटू सावंत, मारुती खोमणे, सुभाष झगडे, ग्रामस्थ उपस्थित होते.
बारामती तालुका राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष शरद चौधर यांच्या राणी चौधर पत्नी आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना तळागाळातील ग्रामस्थांपर्यंत पोहोचवू व विकासकामात अग्रेसर राहून आदर्श ग्रामपंचायत म्हणून वंजारवाडी ग्रामपंचायतीचा नावलौकिक करू, असे निवडीनंतर राणी चौधर यांनी सांगितले. ग्रामसेवक निलेश लवटे यांनी आभार मानले.





