पुणे जिल्हा : सासवडच्या पालखी तळावर रंगली योगसाधना

सासवड – जागतिक योग दिनाचे निमित्ताने सासवड येथील पालखी तळावर सासवडकर नागरिकांनी योग साधना करून हा दिवस साजरा केला. येथील योग विद्या संस्कार केंद्र आणि पुरंदर मेडीकल असोशिएशनच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे निमित्ताने पालखी तळावर वृक्षारोपण करण्यात आले.
जागतिक योग दिनाच्या निमित्ताने दि.15 ते 21 जून असा योग सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या काळात पतांजली योग सुत्र पठण व विविध योगाचे प्रकार करण्यात आले. तर शुक्रवारी (दि. 21) सप्ताहाची सांगता करण्यात आली. योग साधक डॉ. ऋता खांडेकर व डॉ. घनशाम खांडेकर यांनी यावेळी उपस्थितांकडून योग करुन घेतले. वृक्षारोपण करण्यात येणार्या वृक्षांची विधिवत पूजा करून मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
डॉ. घनशाम खांडेकर, डॉ. निरज कामठे, पुरंदर मेडीकल संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण जगताप यांनी याप्रसंगी उपस्थितांना संबोधित केले. महिन्यातून दोन वेळा आपण सर्वांनी पालखी तळावर स्व:च्या आरोग्यासाठी योगासने करू. असे आवाहन डॉ. प्रवीण जगताप यांनी याप्रसंगी केले. याप्रसंगी नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, डॉ. विनायक बांदेकर, आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण, डॉ. सचिन निरगुडे, डॉ. राजेश दळवी,
डॉ. सुरेश बोत्रे, महादेव जगताप, प्रकाश जगताप, माऊली गिरमे, दादा भुजबळ, हेमंत ताकवले, प्रमोद म्हेत्रे, प्रदिप चिंबळकर, संजय काटकर, अभिजित बारवकर, राम कारंडे यांसह योगा करणारे योग साधक उपस्थित होते.





