पुणे जिल्हा : मरकळच्या सरपंचपदी रामदास लोखंडे

अवघ्या एका मताने निवड : शीतल लोखंडे यांचा पराभव
चिंबळी – मरकळ (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रामदास दत्तात्रय लोखंडे यांची अवघ्या एका मताने निवड करण्यात आली.
मरकळ येथील ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून नयना भानुदास लोखंडे यांनी सरपंचपदाचा स्वखुशीने राजीनामा दिला असल्याने या रिक्त जागेसाठी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र वाघ यांच्या अध्यक्षतेखालील निवडणूक घेण्यात आली. यावेळी रामदास दत्तात्रय लोखंडे, हनुमंत काळूराम लोखंडे, सतीश बाजीराव लोखंडे, शीतल बाळासाहेब लोखंडे याचे अर्ज दाखल करण्यात आले होते.
सतीश लोखंडे, हनुमंत लोखंडे यांनी अर्ज माघारी घेतल्याने रामदास लोखंडे व शीतल लोखंडे यांचे अर्ज सरपंचपदासाठी राहिल्याने गुप्त मतदान घेण्यात आले. यामध्ये रामदास लोखंडे यांना आठ मते पडली तर शीतल लोखंडे यांना सात मते पडली असल्याने मरकळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रामदास लोखंडे यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र वाघ यांनी घोषित केले.
या निवडणूक प्रक्रियेत सचिव म्हणून ग्रामविकास विकास अधिकारी व्ही. एम. माघाडे, गाव कामगार तलाठी बी. आर. पाटील यांनी काम पाहिले. या निवडणूक प्रक्रियेत सरपंच माळवत्या सरपंच नयना वर्पे-लोखंडे, उपसरपंच संतोष कुंभार, संतोष भुसे, अमोल लोखंडे, संगिता लोखंडे, शीतल लोखंडे, भानुदास लोखंडे, हनुमंत लोखंडे, सतीश लोखंडे, रामदास लोखंडे, नयना लोखंडे, उज्ज्वला लोखंडे, वैशाली लोखंडे, स्वाती चव्हाण, आशा लोखंडे उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित सरपंच रामदास दत्तात्रय लोखंडे यांचा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच दशरथ लोखंडे, तुकाराम वहिले, सर्व सदस्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बाजीराव लोखंडे, बबन लोखंडे, अर्जुन वर्पे, दत्तात्रय वर्पे, शिवाजी लोखंडे, भगवान लोखंडे, देवीदास लोखंडे, सचिन लोखंडे, बाळासाहेब टाकळकर, सोमनाथ लोखंडे, बाळासाहेब लोखंडे, काळूराम लोखंडे, गणेश लोखंडे, निलेश वर्पे, प्रशांत लोखंडे व आजी माजी पदाधिकार्यांकारी, ग्रामस्थांनी अभिनंदन करून भंडार्याची उधळण करीत मिरवणूक काढण्यात आली.





