पुणे जिल्हा : रामभाऊ म्हाळगी विद्यालयाचे व्हॉलिबॉल स्पर्धेत वर्चस्व

कडूस: खेड तालुकास्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेत कडूस येथील रामभाऊ म्हाळगी विद्यालयाचा वरचष्मा राहिला. या स्पर्धेत 133 संघाच्या सहभागी खेळाडूंनी दमदार खेळ करून क्रीडा रसिकांची मने जिंकली.
स्पर्धेचे उद्घाटन खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे व तालुका क्रीडा अधिकारी प्रकाश मोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच शहनाज तुरुक, उपसरपंच रंजना पानमंद, उद्योजक अभिजीत शेंडे, संस्था अध्यक्ष अशोक गारगोटे, ज्ञानेश्वर शं. ढमाले, मुख्याध्यापक अनिल पोटे, चांगदेव ढमाले, बाळासाहेब बोंबले, संजय जाधव, हेमलता खळदकर, विजया नाईक,
अनिकेत धायबर, गणेश मंडलिक, रवींद्र गायकवाड, सुनंदा गारगोटे, कल्पना शेजवळ, रामदास रेटवडे, प्रवीण काळे, दत्तात्रय येवले, तानाजी कोळेकर, अजिनाथ केदार, बबन डांगले, क्रीडा संघटना अध्यक्ष अध्यक्ष नितीन वरकड, लतीफ शेख, कुंडलिक गारगोटे, शंकर शिंदे, अजीज शेख उपस्थित होते. विशाल गुंजाळ, करण पोटे, पार्थ जाधव, प्रीतम ढमाले, तन्मय ढमाले, सार्थक धानापुने, ओंकार ढमाले यांनी स्पर्धेत पंच म्हणून काम पाहिले.
वयोगटनिहाय विजयी संघ (गाव) :
19 वर्षे (मुले) : हुतात्मा राजगुरू महाविद्यालय (राजगुरूनगर), शिवाजी विद्यामंदिर (चाकण), भामचंद्र माध्यमिक विद्यालय (भांबोली). मुली : हुतात्मा राजगुरू महाविद्यालय, (राजगुरूनगर), शिवाजी विद्यामंदिर (चाकण), भामचंद्र माध्यमिक विद्यालय (भांबोली)
17 वर्षे (मुली) : अनुसूचित जाती जमाती विद्यालय (चांडोली), रामभाऊ म्हाळगी विद्यालय (कडूस), विद्यानिकेतन (चाकण). (मुले) : रामभाऊ म्हाळगी विद्यालय (कडूस), भामचंद्र माध्यमिक विद्यालय (भांबोली), कुंडेश्वर विद्यालय (पाईट).
14 वर्षे वयोगट (मुली) : रामभाऊ म्हाळगी विद्यालय (कडूस), विद्यानिकेतन (चाकण), केटीएस इंग्लिश मीडियम. (मुले) : रामभाऊ म्हाळगी विद्यालय (कडूस), आनंद इंग्लिश मीडियम स्कूल (कुरुळी), केटीएस इंग्लिश मीडियम (राजगुरूनगर).





