पुणे जिल्हा : शिक्रापुरातील राम कृष्ण हरी फ्लेक्स ठरतोय लक्षवेधी

शिक्रापूर – पुणे-नगर महामार्गावरील सर्वात महत्वाचे गाव असल्याने येथे अनेकदा राजकीय घडामोडी करणारे विविध फ्लेक्स नागरिकांचे लक्ष वेधून घेत असताना नुकतेच या महामार्गावर लावण्यात आलेला राम कृष्ण हरी फ्लेक्स चर्चेचा विषय बनला आहे.
शिक्रापूर हे पुणे-नगर महामार्गावरील सर्वात महत्वाचे गाव असल्याने येथे वर्षभर वेगवेगळ्या राजकीय घडामोडी, आंदोलने, उद्घाटने, लग्न सोहळे, दशक्रिया, नेत्यांचे वाढदिवस यांसह विविध कार्यक्रम व उपक्रमाचे फ्लेक्स लागत असतात. तर येथे लागणार्या फ्लेक्समुळे वेगवेगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत.
सध्या येथील महामार्गावर नव्याने भलामोठा एक फ्लेक्स लावण्यात आलेला असून त्यावर फक्त राम कृष्ण हरी हे अक्षरे असून अन्य कोणताही शब्द अथवा अक्षर नसल्याने या फ्लेक्सचा अर्थ काय व त्या फ्लेक्समुळे काय साध्य होणार आणि राम कृष्ण हरी नावाचा फ्लेक्स लावला कोणी याबाबत काहीही माहिती नसून सध्या या फ्लेक्स चर्चेचा विषय बनला असून पुणे-नगर महामार्गावर नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.





