पुणे जिल्हा : राहुल कुलांची आरोग्य सेवा सुरूच

प्रचाराच्या धामधूमीत रुग्णांना सेवेत तत्पर
दौंड – दौंड विधानसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांनी मतदारांसाठी कार्यरत असलेली आरोग्य सेवा सुरूच ठेवली आहे. गेल्या महिन्याभरात २० पेक्षा अधिक रुग्णांना मदत केली आहे. त्यामुळे कुल यांची आरोग्यदूत ही ओळख पुन्हा अधोरेखित झाली आहे.
दौंडच्या निवडणुकीत देखील आमदार राहुल कुल यांच्याकडून आरोग्य सेवेचे काम सुरूच असल्याचा प्रत्यय तालुक्यातील जनतेला येत आहे. निवडणूक रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे. महायुतीचे उमेदवार दौंडचे आमदार कुल यांनी गेल्या महिनाभरात प्रचार यंत्रणेची धामधूम असताना देखील त्यांची मुख्य ओळख असणारे आरोग्यसेवेचे काम सुरूच ठेवल्याचे दिसून आले आहे.
गेल्या महिन्याभरात त्यांनी वीसहून अधिक रुग्णांना आरोग्य सेवेसाठी मदत केले आहे. प्रचार सभेत असताना देखील त्यांना आरोग्य सेवेचा निरोप आल्यानंतर आपल्या स्वीय सहाय्यकाच्या मार्फत त्यांनी संबंधित रुग्णाचे काम मार्गी लावले आहेत. एक प्रकारे मदतीचा हात या रुग्णांना दिला आहे. आमदार राहुल कुल यांनी गेल्या दहा वर्षात रुग्णसेवेचे हजारो कामे केलेली आहेत.
मागील विधानसभा निवडणुकीत देखील कुलांच्या विजयात ही रुग्णसेवा आणि आशीर्वादाचा कामाला आल्याचे बोलले जात आहे. निवडणूक काळात त्यांनी केलेल्या या रुग्णसेवेचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
दरम्यान, निवडणुकीच्या प्रचार काळात राहुल कुल हे करीत असलेले आरोग्य सेवेचे काम त्यांना विजयापर्यंत घेऊन जाईल, असा विश्वास यावेळी नागरिकांनी व्यक्त केला आहे.
रुग्णसेवा ही माझी जबाबदारी
महायुतीचे उमेदवार, आमदार राहुल कुल म्हणाले, निवडणूक ही तात्पुरत्या स्वरूपाची असून नागरिकांच्या मदतीला उभे राहणे अत्यंत गरजेचे आहे. असे सांगत रुग्णसेवा ही माझी जबाबदारी नसून कर्तव्यच आहे.





