पुणे जिल्हा : बारामती राष्ट्रवादीच्या कार्यालयात महिलांच्या रांगा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सुविधा उपलब्ध
बारामती – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरसावला आहे. शहर कार्यालयात रांगा लावून महिलांनी अर्ज दाखल करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता केली आहे. राष्ट्रवादी कार्यालयात ही सुविधा उपलब्ध करून दिल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले आहे.
राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेसाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. योजनेच्या माध्यमातून अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न कुटुंबातील महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 सरकार देणार आहे. त्यासाठी दोन 15 जुलै पर्यंत अर्ज दाखल करण्याचा कालावधी आहे. त्यामुळे तलाठी कार्यालय तसेच प्रशासकीय कार्यालयात एकच झुंबड उडाली आहे.
या सर्व प्रक्रियेमध्ये महिलांना हा त्रास सहन करावा लागू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शहराध्यक्ष जय पाटील यांनी शहर कार्यालयातच अर्जासाठी लागणार्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. एका छताखाली सर्व प्रक्रिया पार पडत असल्याने महिलांनाही शासन दरबारी हेलपाटे मारावे लागणार नाहीत. आज या योजनेचा शुभारंभ शहर कार्यालयात झाला.
महिलांनी अक्षरशा रंगा लावत कागदपत्रे सादर केली. यावेळी शहर कार्यालयात मोठ्या प्रमाणात महिलांनी गर्दी केली होती. तलाठी कार्यालय, नागरी सुविधा केंद्र तसेच तहसील कार्यालयाशी समन्वय साधत ऑनलाइन पद्धतीने अर्ध दाखल केले जाणार आहेत. अशा प्रकारची सुविधा मिळाल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी शहर युवक अध्यक्ष अविनाश बांदल, महिला अध्यक्ष अनिता गायकवाड उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठ्या प्रमाणात निधी जाहीर केला आहे. बारामतीतील महिलांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळावा यासाठी शहर कार्यालयात कागदपत्रांची पूर्तता करून घेतली जात आहे. अर्ज दाखल करण्यासाठी महिलांना मदत केली जात आहे. अर्ध दाखल करण्याच्या कालावधीपर्यंत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. शहरातील महिलांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा.
– जय पाटील, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)





