पुणे जिल्हा : सोपानदेव मंदिरात भाविकांच्या रांगा
Updated On:

सासवड : सासवड येथील सोपानदेव मंदिरात कार्तिकी एकादशी निमित्ताने श्री संत सोपान काका महाराजांच्या समाधीवर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर रांगा लावल्या होत्या. विविध कार्यक्रमांचे आयोजन मंदिरामध्ये करण्यात आले.
सकाळी अभिषेक महापूजा, संत सोपान देवांना पोशाख करण्यात आला. ११ ते १ सामुदायिक हरिपाठ, नंतर फराळ, दुपारी प्रवचन, हनुमान भजनी मंडळातर्फे भजन. रात्री खानवडी ग्रामस्थांतर्फे ह.भ.प स्वप्नील महाराज काळाणे यांचे कीर्तन, किर्तन झाल्यानंतर मंदिर प्रदक्षिणा झाली व नंतर खानवडी ग्रामस्थांतर्फे हरिजागर करण्यात आला.
कार्यक्रमाचे नियोजन देवस्थानचे प्रमुख विश्वस्त हभप त्रिगुण महाराज गोसावी, व्यवस्थापक हभप हिरु काका गोसावी, चोपदार हभप सिद्धेश शिंदे, हभप अभय जगताप यांनी केले.





