Pune District : जालनाप्रकरणी आरोपीवर मोका लावा

बारामती : भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील कैलास बोराडे या तरुणास महादेव मंदिरात दर्शनासाठी का गेला या वादातून जानेफळ (गायकवाड) येथील गावगुंडाने लोखंडी रॉडला चुलीवर तापवून अंगाला चटके देत जीवघेणा हल्ला केला. अशा अमानवीय कृत्याबद्दल या गावगुंडांवर कठोर मोका अंर्तगत कारवाई होवून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
कैलास बोराडे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ बारामती तालुका सकल धनगर, ओबीसी समाजाच्या वतीने प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यावेळी शिष्टमंडळाने ही मागणी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेत दोषींवर मोका लावून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बारामती तालुका सकल धनगर, ओबीसी समाजाच्या वतीने केली आहे.
यावेळी यशवंत ब्रिगेडचे अध्यक्ष बापूराव सोलनकर, रासपचे तालुकाध्यक्ष ऍड. अमोल सातकर, संपतराव टकले, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव धवडे, आर. आर मारकड, वसंतराव घुले, गोरख रुपणावर आदी मान्यवर उपस्थित होते.





