पुणे जिल्हा : पूर्वा वळसे पाटील यांचा पेठ गावात दौरा

मंचर – पेठ (ता.आंबेगाव) येथे युवा अभियानांतर्गत पूर्वा वळसे पाटील यांचा गाव भेट दौरा नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी पूर्वा वळसे पाटील यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. तसेच निवडणुकीच्या तोंडावर मतदारांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन पूर्वा वळसे पाटील यांनी ग्रामस्थांना केले.
याप्रसंगी बाजारपेठेतील ज्येष्ठ व्यावसायिक अशोकशेठ तळेकर यांनी पूर्वा वळसे पाटील यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महायुतीचे स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गाव भेट दौऱ्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे, शरद सहकारी बँकेचे संचालक संतोष धुमाळ, पेठचे सरपंच संजय पवळे, पेठचे माजी सरपंच रामशेठ तोडकर, शिवसेना उपतालुका प्रमुख भगवान धुमाळ,
राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रमुख अक्षदा शिंदे, अर्चना बुट्टे, स्वाती काळे, उर्मिला कांबळे,आकाश नवले, सरपंच भावडी, मनोहर भोजने, रोहित ढमाले आदी मान्यवर या दौऱ्या दरम्यान सहभागी झाले होते.





