पुणे जिल्हा : पुरंदर हवेलीतील स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा उद्या सन्मान

सासवड – सासवड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेंटर ऑफ एक्सलन्स आणि सासवड नगरपालिकेच्या वतीने पुरंदर-हवेली मतदारसंघातील सर्वसामान्य, शेतकरी कुटुंबातील यूपीएससी, एमपीएससी, एसटीआय व इतर परिक्षांमधून शासकीय विविध पदांवर निवड झालेल्या 30 युवक- युवतींचा गौरव रविवारी (दि 6) सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेंटर ऑफ एक्सलन्सचे अध्यक्ष, आमदार संजय जगताप यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेंटर ऑफ एक्सलन्सच्या सदस्यांनी दिली.
याप्रसंगी दौंड- पुरंदरचे उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी डॉ. अमिता पवार, तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव, सासवडचे मुख्याधिकारी निखिल मोरे, सासवडचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी सचिव अनिल गद्रे, सदस्य रविंद्रपंत जगताप सेवानिवृत्त मुख्याध्यापक शहाजी गरूड़, मिनल जाधव, दीपक जगताप उपस्थित होते.





