Pune District : पुणे-मिरज रेल्वे दुहेरी मार्ग कार्यन्वित

शिंदवणे घाटमाथ्यावरून दुहेरी रेल्वे धावल्या
वाघापूर – महाराष्ट्र राज्यातील लक्षवेधी ठरलेला पुणे-मिरज मार्गावरील पुरंदर तालुक्याच्या जयाद्री खोर्यातील पुणे-कोल्हापूर मिरज दुहेरी रेल्वे मार्ग आता कार्यन्वित झाला असून शिंदवणे घाट माथ्यावरून केंद्रीय रेल्वे विभागाच्या परिश्रमातून उभारलेल्या दुहेरी मार्ग आणि दुहेरी बोगद्यातून आता रेल्वे धावू लागल्या आहेत. पुणे-सातारा 145किमी मार्गाचे काम पूर्ण पूर्ण झाले आहे.
मध्यरेल्वे विभागाला आव्हात्मक ठरलेला जयाद्री खोर्यातील शिंदवणे घाट माथ्यावरले कठीण काम पूर्ण करण्यात यश मिळाले असून हे काम भौगोलिक दृष्टीने कठीण होते; परंतु प्रगतीशील भारतीय उत्तम रेल्वे तंत्र आणि कौशल्य यामुळे हा मार्ग उभारला गेल्याचे प्रत्यक्षदर्शी आणि सामाजिक कार्यकर्ते प्रकाशराजे कुंजीर यांनी सांगितले.
या दुहेरी कारणामुळे रेल्वे गाड्या वेळेवर धावणार असून या मार्गांवरील जेजुरी-लोणंद मार्गांवरील वाढते औद्योेगिककरण परिसरातील पर्यटन आणि तीर्थक्षेत्रे पाहता मालगाड्याची संख्या ही वाढविण्यात येत असल्याचे संबंधित रेल्वे अधिकार्यांनी सांगितले. राज्यातील तीर्थक्षेत्र आणि पर्यटन नगरी जेजुरी रेल्वे स्थानकाचा कायपालट होत असून लवकरच या स्थानकात सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना थांबा आणि एखाद्या एक्स्प्रेस गाडीला जयाद्री अथवा मल्हार एक्स्प्रेस नाव मिळणार असून याबाबत जेजुरी रेल्वे प्रवासी संघटना, श्री मार्तंड देवसंस्थान, ग्रामस्थ भाविक पर्यटक उद्योजक आणि विविध पक्ष्याच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाशी निवेदनही दाखल केले असल्याचे जेजुरी भाजपा मंडल अध्यक्ष सचिन पेशवे यांनी सांगितले.
16 तीव्र वळणे, 13 छोटे पूल
रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी 17 जून 2025 रोजी तपासणी केल्यानंतर दुहेरी मार्गांवर रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली. शिंदवणे, आंबळे दरम्यान काम पूर्ण करण्यासाठी 140 मीटर लांबीचा एक बोगदा बांधला तीव्र उतार असल्याने अचूक योजना अखण्यात आले. 13 भागात विभागलेला पूल बांधण्यात आला. हा पूल एक वर्षात पूर्ण करण्यात आला. 16 तीव्र वळणे आणि 13 छोटे पूल उभारण्यात आले.
शिंदवणे : घाट माथ्यावरून दुहेरी मार्ग आणि दुहेरी बोगद्यातून आता रेल्वे धावू लागल्या आहेत.





